बाबरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत निरोप समारंभ

Foto

फुलंब्री, (प्रतिनिधी) _:  तालुक्यातील बाबरा येथिल केंद्रीय प्राथमिक शाळेत बुधवारी (दि.२२) निरोप समारंभाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, बदली झालेल्या शिक्षकांना निरोप, शिक्षिका स्वप्नाली मानकापे यांनी सीटीईटी परीक्षेत १२१ गुण मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार असा बहुमाननीय कार्यक्रम याप्रसंगी पार पडला.

सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शालेय आठवणींना उजाळा दिला. यानंतर बदली झालेल्या शिक्षिका शितल मुरकुटे, आम्रपाली कंकाळ आणि अश्विनी चोपडे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 

स्वप्नाली मानकापे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळा व व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख यासेर शेख राधेश्याम हिवाळे, मुकीम, शेख अलीम व सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम आनंददायी व संस्मरणीय ठरला. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथिल केंद्रीय प्राथमिक शाळेत बुधवारी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.